PUNE : संचारबंदीत त्यांन स्वतःसाठी 8 बिअरच्या बाटल्या आणल्या पण पोलीसांनी पकडल्या…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असून सर्व आस्थापना बंद आहेत. पंरतु याकाळात देखील स्वतः साठी कारमधून 8 बिअरच्या बॉटल घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले. कात्रज परिसरात हा प्रकार घडला आहे.

विनय सुधीर फुलावरे (वय २५ , रा. उंद्री चौक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रवीण महामुनी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय हॉटेल व्यवसायिक आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट परीसरातुन मोटारीतून जात होता. त्यावेळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्याला अडविले. त्याच्या मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये ८ बियर बाटल्या मिळून आल्या. चौकशीत त्याने स्वतः साठी बियर घेऊन चालला असल्याचे सांगितले. मात्र, संचारबंदीत फिरण्यासाठी मनाई असतानाही विनयने नियमांचे उल्लंघन केले. तसेच मद्याची वाहतूक केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.