पुणे : अवैध धंद्यावर गुन्हे शाखेकडून छापे, नगरसेवकाच्या अंगरक्षकाकडून रिव्हॉल्वर जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये जुगार आड्डा, हुक्का पार्लरवर छापे टाकून संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री बारा ते पहाटे तीन दरम्यान करण्यात आली.
[amazon_link asins=’B010U37EM8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae69854f-a2f8-11e8-84f3-addfd7877e53′]

पुलगेट बस स्टॉप शेजारी असलेल्या सोलापूर बझार येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छाप टाकून जुगार खेळणाऱ्या २३ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन व्यवस्थापकांचा समावेश असून या कारवाईत पोलिसांनी २ लाख ६७ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

दुरऱ्या कारवाईत कोरेगांव पार्ख येथील हॉटेल इथोपीया एण क्युब येथे अनाधिकृतरित्या चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सहा खटले कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

हॉटेल इथोपीया एण क्युब येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान आर.पी.सिंग (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) याच्या कब्जात असलेली एक रिव्हॉलव्हर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या रिव्हॉल्वरचा परवाना उत्तर प्रदेश सरकारचा असताना त्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विवेक यादव यांचा अंगरक्षक म्हणून काम करत असताना रिव्हॉल्वर बाळगली. पोलिसांनी त्याच्याकडून १ रिव्हॉल्वर आणि ११ जिवंत राऊंड जप्त केले आहेत. सिंग याचे विरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B015KHN37E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b3f13b2f-a2f8-11e8-adc2-9b3d9ae7dc9d’]

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या ४ अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांनी केली.