Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठी कमी होऊन पाणी संकट उभे राहते की काय असे वाटत होते. मात्र, आता धरण (Dam) परिसरात पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने टेमघर (Temghar), वरसगाव (Varasgaon), पानशेत (Panshet) आणि खडकवासला (Khadakwasla) धरणसाखळीत (Dam Chain) पाणी पातळी समाधानकारक वाढत आहे. मंगळवारी रात्रीपासून आज सकाळपर्यंत या धरण परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

 

मंगळवारपासून आज सकाळपर्यंत धरण परिसरात झालेला पाऊस

टेमघर धरण क्षेत्र – 65 मिलिमीटर

वरसगाव धरण क्षेत्र – 70 मि.मी

पानशेत धरण क्षेत्र – 68 मि.मी

खडकवासला धरण क्षेत्र – 18 मि.मी

 

सध्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 3.67 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 12.59 टक्के पाणीसाठा (Water Storage) जमा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांत 3.35 टीएमसी पाणीसाठा होता. जलसंपदा विभागाने (Water Resources Department) सांगितले की, मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी 0.32 टीएमसीने पाणीसाठ्यात (Pune Rain) वाढ झाली आहे.

 

Web Title :- Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

 

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

 

Pune News | GPA तर्फे ‘डाॅक्टर्स डे’ उत्साहात साजरा ! डाॅ.विजय पाटील यांना ‘जी पी डाॅक्टर ऑफ ईयर’ पुरस्कार प्रदान