Pune Rains – Ujani Dam | पुण्यात दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे उजनीत येणार 5 टीएमसी पाणी

पुणे : Pune Rains – Ujani Dam | दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे सोलापूर, पुणे व नगरला पाणी पुरवणाऱ्या उजनी धरणात ५ टीएमसी पाणी येईल. सोलापूर, पंढरपूरसाठी जेवढे पाणी सोडले, तेवढेच पाणी पुन्हा धरणात येणार आहे. (Pune Rains – Ujani Dam)

पाऊस संपत आला तरी उजनी धरणातील पाणीसाठा २५ टक्के सुद्धा झालेला नाही. उजनीच्या पाण्यावरच सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पिके तग धरतात. तसेच शंभरहून अधिक ग्रामपंचायतींसह सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील काही नगरपालिका व पुणे, सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना उजनीचे पाणी मिळते. यातील सोलापूर जिल्हा सध्या कमी पावसामुळे दुष्काळाच्या छायेत आहे.

दरम्यान, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की,
मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्याने उजनीमध्ये दौंडवरून
साडेतीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत धरणात
पाच टीएमसीपर्यंत पाणी येईल आणि धरण पुन्हा २५ टक्के होईल.

उजनीतून सोलापूर, पंढरपूरसाठी सोडलेले पाणी आता २९ सप्टेंबरला बंद केले जाईल.
त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | फिरण्यासाठी आलेल्या गुजरातमधील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातील घटना

Ajit Pawar | अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर का?, अजित पवार म्हणाले -‘मी त्यांना…’