SpiceJet च्या 50% उड्डाणांवर पुढील 8 आठवड्यांसाठी बंदी, DGCA ने तांत्रिक बिघाड प्रकरणात केली मोठी कारवाई

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SpiceJet | डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने बुधवारी 27 जुलैला स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत त्यांचे फ्लाइट ऑपरेशन पुढील 8 आठवड्यांसाठी 50 टक्के कमी केले आहे. ही कारवाई अशावेळी झाली आहे, जेव्हा स्पाईसजेटच्या अनेक उड्डाणांमध्ये अलिकडेच तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी आल्या होत्या. (SpiceJet)

 

ADV

स्पाईसजेटच्या उड्डानांमध्ये 19 जूनपासून 6 जुलैच्या दरम्यान तांत्रिक बिघाडाची किमान 8 प्रकरणे समोर आली होती. यानंतर डीजीसीएने 6 जुलैला स्पाईसजेटला एक कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.

 

एव्हिएशन सेक्टरचे रेग्युलेटर डीजीसीएने बुधवारी आपल्या आदेशात म्हटले की, विविध ठिकाणी स्पॉट चेकिंग, तपासणी आणि स्पाईसजेटकडून कारणे दाखवा नोटीशीत दिलेले उत्तर लक्षात घेता, एक सुरक्षित आणि विश्वसनीय विमान उड्डाण सेवा जारी ठेवण्यासाठी, स्पाईसजेटच्या मंजूर उड्डाणांची संख्या पुढील 8 आठवड्यांसाठी 50 टक्केवर मर्यादित केली जात आहे. (SpiceJet)

 

स्पाईसजेटने अलिकडेच म्हटले होते की, डीजीसीएने त्यांच्या 10 विमानांचे काही दोष दाखवले होते, जे दुरूस्त करण्यात आले आहेत आणि ती सर्व 10 विमाने पुन्हा फ्लाइट ऑपरेशन्समध्ये सहभागी झाली आहेत.

यापूर्वी डीजीसीएने स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटीस जारी करताना म्हटले होते
की, एयरक्राफ्ट रूल्स 1937 अंतर्गत एक सुरक्षित, कुशल आणि विश्वसनीय विमानसेवा देण्यास स्पाईसजेट अयशस्वी ठरली आहे.
रेग्युलेटरने स्पाईसजेटच्या जबाबदार मॅनेजरला तीन आठवड्याच्या आत कारणे दाखवण्यास सांगितले होते
की, अखेर त्याच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये.

 

डीजीसीएला निरीक्षणात आढळले की, अंतर्गत सुरक्षेच्या निरीक्षणाच्या बाबतीत निष्काळजीपणा करण्यात आला आहे
आणि मेंटनन्स किंवा देखरेखबाबत सुद्धा अयोग्य कार्यवाही करण्यात आली.
हे सुद्धा आढळले की, सप्लायर आणि व्हेंडर्सला नियमित आधारावर पेमेंट केले जात नव्हते.
डीजीसीएच्या निरीक्षणात स्पेअरपार्टमध्ये दोष आढळला आणि एयरलाईन कॅश अँड कॅरी मॉडलवर काम करत होती.

 

Web Title :- SpiceJet | dgca curtailes spicejet flight operations to 50 percent for 8 weeks after multiple technical snags reports

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tiger Shroff-Disha Patani Breakup | टायगर श्रॉफ-दिशा पटानीचे ब्रेकअप, 6 वर्षांच्या डेटिंगनंतर नाते संपले!

 

Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?