Pune Rickshaw Strike | आज पुन्हा रिक्षाचे आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनाची हाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज (दि. १२ डिसेंबर) रोजी पुन्हा एकदा सोमवारी रिक्षा बंदची (Pune Rickshaw Strike) हाक देण्यात आली आहे. बाइक रॅपिडोच्या विरोधात रिक्षा संघटनांनी हा बंद पुकारला आहे. मागेदेखील 28 नोव्हेंबरला रिक्षाचालकांनी असाच बंद पुकारला होता. त्यावेळी आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. आज सोमवारीदेखील असाच चक्का जाम करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी (Pune Rickshaw Strike) दिला.

 

दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी. त्यामुळे आमच्या पोटावर पाय येत आहे, असे रिक्षा संघटनांचे मत आहे. बेकायदा बाइक टॅक्सी विरोधात ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने बेकायदा बाइक टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला होता तसेच मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आश्वासनानंतर रिक्षा संघटनांनी हा संप मागे घेतला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंद करू नका, असे आवाहन रिक्षा संघटनांना केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशिररित्या आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाइक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे,
असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या समितीत प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपायुक्त (सायबर शाखा), पोलीस उपायुक्त (वाहतूक),
पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे.
या समितीने 7 डिसेंबरला झालेल्या बैठकीत बाइक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

 

Web Title :- Pune Rickshaw Strike | auto rickshaw drivers firm on protest today 12th december pune RTO office news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार