Pune Ring Road | पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 250 कोटींचा निधी वर्ग; मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ring Road | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी अडीचशे कोटींचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात दिली. या रिंगरोडसाठी चालू वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अडीचशे कोटी रुपये निधी वर्ग करण्यात आला आहे. (Pune Ring Road)

 

महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) चालू वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) एमएसआरडीसीच्या रिंगरोडसाठी १५०० कोटींचा निधी मंजूर केला होता. तत्कालीन वित्तमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही घोषणा केली होती. अजित पवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या रिंगरोडच्या निधीला विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) देखील कात्री लावलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतरही या प्रकल्पाला निधी देण्यात आला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून त्यामध्ये सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाला अधिक गती मिळणार आहे. (Pune Ring Road)

 

या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन जमिनींचे खरेदीखत करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जमीन जाणाऱ्या गावांची मोजणी पूर्ण करून मोबदल्याची दरनिश्‍चिती करण्यात आली आहे आणि त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रकल्पाला स्वत:हून जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या पाचपट मोबदला देण्याचा निर्णयही यापूर्वीच घेण्यात आला आहे.

प्रकल्पाचा आढावा पुढीलप्रमाणे
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्‍चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत.
पूर्व भागात मावळातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आमि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे,
तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे.
मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित आहे.
भूसंपादनासाठी या तालुक्यांच्या प्रांत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली असून त्याला राज्य महामार्गाचा दर्जाही मिळाला आहे.
या रस्त्याची लांबी १७२ किलोमीटर असून ११० मीटर रुंदी आहे. प्रकल्पासाठी २३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे.

 

 

Web Title :- Pune Ring Road | 250 crore fund category for land acquisition of Pune Ring Road; Information of the Chief Minister in the Legislature

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन, गोव्यात हार्ट अटॅकने गमावला जीव

 

PM Kisan-Pune | पीएम किसान योजनेच्या चुकीच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात जिल्हा प्रशासन ‘फेल’

 

CM Eknath Shinde | पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी MSRDC ला अडीचशे कोटी रुपये वर्ग, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती