Pune RTO | ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे (Pune RTO) यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) व बारामती (Baramati) या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या (Khatua Committee) शिफारशीनुसार 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. ऑटोरिक्षांचे (Auto Rickshaw) मीटर पुनःप्रमाणीकरण (Revalidate) करण्या करीता मुदतवाढ देऊनही पुन:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. (Pune RTO)

 

ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा भाडे मीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम विहीत मुदतीत न केल्याने तसेच ऑटो रिक्षा संघटनांकडून (Auto Rickshaw Associations) ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यास सुरुवातीस 1 ते 30 नोव्हेंबर आणि नंतर 1 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने (Pune RTO) घेतला होता.

 

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन (Meter Calibration) करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे.
मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान 7 दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी 1 दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रूपये मात्र किमान 500 रूपये आणि कमाल तडजोड शुल्क 2 हजार रूपयांपर्यंत असेल. मीटर तपासणीचे काम फुले नगर व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सुरूच राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (RTO Ajit Shinde) यांनी कळविले आहे.

 

Web Title :-  Pune RTO | Action against auto rickshaw drivers who do not revalidate auto rickshaw meters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ