Pune RTO Office News | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उरुळी कांचन येथील शिबीर 14 ऐवजी 26 जून रोजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune RTO Office News | संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याच्या (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (Pune Regional Transport Office) अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथे आयोजित शिबीर कार्यालय १४ जून ऐवजी २६ जून रोजी घेण्यात येणार आहे. (Pune RTO Office News)

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी पुणे येथून सोलापूर रोड मार्गे उरुळी कांचनकडे १४ जुन २०२३ रोजी प्रयाण करणार आहे. या दिवशी पुणे-सोलापूर महामार्गावरील इतर वाहतूक बहुतांश प्रमाणात बंद असते. त्यामुळे शिबीर कार्यालयामध्ये पोहोचताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. (Pune RTO Office News)

यास्तव ज्या उमेदवारांना अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन शिबीर कार्यालयातील १४ जून
रोजीची अपॉइंटमेंट मिळालेली आहे अशा उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी २६ जून रोजी शिबीर कार्यालयाच्या
पूर्वनियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (Pune RTO Ajit Shinde) यांनी केले आहे.

 

 

Web Title : Pune RTO Office News | Camp of Pune Regional Transport Office at Uruli Kanchan on 26th June instead of 14th


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा