अफवा अन् पोलिसांची धावपळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संवेदनशील अन् उच्चभ्रु परिसर म्हणून ओळख असणार्‍या गुडलक चौकाजवळील बोळीत एकावर वार झाल्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला अन पोलीसांची एकच धावपळ उडाली. अनेकांकडे चौकशी केल्यानंतर असे काहीच झाले नसल्याची समजले. त्यानंतर पोलीसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

त्याच झालं अस, सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीसांच्या नियत्रंण कक्षाला (शंभर क्रमांक) एकाने फोनकरून गुडलक चौकाजवळील बोळीत एकावर कोयत्याने वार केल्याची माहिती दिली. ही माहिती डेक्कन पोलीसांना देण्यात आली. डेक्कन पोलीसांचे बीट मार्शल पोलिसांना दिली. बीट मार्शलसह डीबीच्या पथकांनी आणि वरिष्ठांनी याठिकाणी धाव घेतली. पण, कोठेच गोंधळ किंवा वार झाल्याचे आढळून आले नाही.

मग, या पथकांनी आजूबाजुच्या पथारी व्यावसायिक तसेच दुकानदारांना विचारपूस केली. त्यांनीही असे काही घडले नसल्याचे सांगितले. त्यावर न थांबता डेक्कन पोलीसांनी मग, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यातही काही गडबड आढळून आली नाही. दोन ते तीन तास वार झाल्याच्या कॉलचा पोलिसांनी कसून तपास केला. पण, हाती काहीच लागले नाही. त्यावेळी पोलिसांना असे काही घडलेच नसल्याचे लक्षात आले आणि पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/