Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवला ‘जय भीम’ चित्रपट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Rural Police | भारतीय चित्रपटांमधील सर्वाैत्कृष्ठ ठरणारा चित्रपट जय भीम (Jai Bhim) या चित्रपटाची समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरू आहे. ‘जय भीम’ या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पंसती देखील मिळाली आहे. सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट एका सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देणारा आहे. दरम्यान हाच जय भीम चित्रपट आता पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलिसांनी (Pune Rural Police) देखील अनुभवला आहे. हा चित्रपट पाहण्याचा आनंद त्यांनी घेतला आहे.

 

आज (बुधवारी) पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांचे सोबत गुन्हे आढावा बैठकीत ‘जय भीम’ चित्रपट पाहिल्याची माहिती पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी फेसबूकवर पोस्ट करत दिली आहे.
जय भीम (Jai Bhim) या चित्रपटाबाबत बोलताना एसपी देशमुख म्हणाले की, चित्रपटामध्ये अतिशय प्रभावीपणे, तामिळनाडूमध्ये 1995 मध्ये झालेल्या एका हाय कोर्टातील खटल्याची गोष्ट मांडण्यात आलीय.
स्वतःच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी सेंगणी (Sengani), तिची बाजू न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडून तिला न्याय मिळवून देणारे वकील चंद्रू (Lawyer Chandru) आणि सर्व दबाव झुगारून निपक्षपातीपणे तपास करून सत्य कोर्टासमोर ठेवणारे पोलीस अधिकारी पेरीमल स्वामी (Perimal Swami) या कथेतील प्रमुख नायक आहेत.

 

पण कथेचा आत्मा बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना, तिने प्रत्येक भारतीयाला, विशेषतः समाजातील दुर्बल, वंचित घटकांना दिलेले मूलभूत अधिकार आहेत.
ते अधिकार प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी, व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची क्षमता आणि प्रेरणा देखील बाबासाहेबांच्या विचाराने नायकामध्ये निर्माण झाली आहे. असं देशमुख म्हणाले.

पोलीस कोठडीमधील अत्याचार, पोलीस तपासामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा अभाव, गुन्हेगारी जमात हा ब्रिटिश काळातील शिक्का मिटवण्याची आवशक्ता
अजूनही अस्तित्वात असणारी जातीय विषमता असे अनेक विषय हा चित्रपट अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करतो.
अतिशय अंतर्मुख करणारा अनुभव या चित्रपटाने दिला आहे.
चित्रपटाच्या शेवटी जेव्हा नायक वर्तमानपत्र वाचण्यासाठी हातात घेतो.
तेव्हा निरक्षर आणि आदिवासी संगिनीची 6 वर्षाची पोरं देखील त्याच ऐटीत वर्तमानपत्र हातात घेते.
तो क्षण भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा असल्याची भावना एसपी देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी मांडली आहे.
तसेच सर्वांनी पाहावाच असा हा चित्रपट असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

 

Web Title : Pune Rural Police | jay bhim movie seen pune rural police sp dr abhinav deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bombay High Court | आरोप करण्याआधी शहानिशा केली होती का? ‘समीर वानखेडेंच्या विरोधात बोलण्यास बंदी घालता येणार नाही, पण…’

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक; एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Gold Price Today | सोन्याचे दर वाढले, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर

Joint Pain In Winter | थंडीत त्रास देतील सांधे आणि हाडांच्या वेदना, ‘या’ 5 पद्धतीने मिळेल आराम