Pune Rural Police | व्यावसायिक व उद्योजकांकडे खंडणी मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार – SP डॉ. अभिनव देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माथाडी कामगार (mathadi workers) किंवा इतर संघटनांची भीती दाखवून वाहतूक व्यावसायिक व उद्योजकांकडे पैसे मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. कोणत्याही उद्योजक किंवा व्यावसायिकाने घाबरून न जाता असा प्रकार घडला तर पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील सिंहगड इडस्ट्रीयल असोसिएशनने (Sinhagad Industrial Association) आयोजित केलेल्या कार्याक्रमात पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) बोलत होते.

मागील काही दिवसांपासून सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरातील नऱ्हे, नांदेड (Nanded), धायरी परिसरातील उद्योजक, व्यावसायिक यांना धमकावून पैशांची मागणी होत होती.
याशिवाय मालवाहतूक करणारी वाहने अडवून चालकाला धमकावून पैसे वसूल करण्यात येत होते.
पैसे मागणारे माथाडी कामगार संघटनेचे असल्याचे सांगत असल्याने व जमाव करुन येत असल्याने व्यावसायिक व वाहनचालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
याबाबत असोसिएशनने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.

व्यावसायिक आणि वाहनचालक यांच्यातील भीती दूर करण्यासाठी (Pune Rural Police) पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्वत: कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील (Haveli SDPO Sai Bhore Patil), पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar), सुरक्षा शाखा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे (Yashwant Nalawade), सिंहगड इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अध्यक्षा पल्लवी जाधव (Pallavi Jadhav, President of Sinhagad Industrial Association), उपाध्यक्ष जितेंद्र चंपानेरकर (Jitendra Champanerkar), सचिव सुप्रिया जगदाळे (Supriya Jagdale), सचिन दांडेकर (Sachin Dandekar), योगेश बोराटे (Yogesh Borate), सतीश पाटील (Satish Patil) यांच्यासह परिसरातील उद्योजक व वाहनचालक उपस्थित होते.

Web Title :- Pune Rural Police | those who are demanding ransom towards Professionals and entrepreneurs will be caught red-handed – SP Dr. Abhinav Deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळेल डबल ‘बोनस’, जाणून घ्या किती वाढून येणार वेतन

LPG Cylinder Update | जुन्या LPG सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, किंमत जवळपास सारखीच; जाणून घ्या फायदे?