7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळेल डबल ‘बोनस’, जाणून घ्या किती वाढून येणार वेतन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार महागाई भत्ता, महागाई मदत, हाऊस रेंट अलाऊन्समध्ये वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्‍यांना या आठवड्यात आणखी एक भेट (7th Pay Commission) देणार आहे. सरकारने कोरोना संकटात अस्थायी प्रकारे रोखलेल्या दिड वर्षाच्या महागाई भत्त्याचा (Dearness allowance) एरियर कर्मचार्‍यांना दिलेला नाही. अशावेळी सप्टेंबर 2021 च्या दरम्यान केंद्रीय कर्मचार्‍यांना हे थकीत पैसे मिळण्याची आशा आहे.

सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना डबल बोनस मिळू शकतो. सरकारने लाखो कर्मचार्‍यांचा डीए वाढवून 28 टक्के केला आहे. सोबतच हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढवला आहे.

एचआरए 27 टक्के करण्याचा निर्णय
केंद्र सरकारने आदेश जारी करत म्हटले की, सरकारी कर्मचार्‍यांच्या मुळ वेतनाच्या (7th Pay Commission) आधारावर हाऊस रेंट अलाऊन्स आणि डीएमध्ये वाढ करण्यात यावी. नियमानुसार, डीए 25 टक्केपेक्षा जास्त झाल्यास एचआरएमध्ये वाढ करावी लागते. यासाठी केंद्र सरकारने एचआरए वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

एचआरए सुद्धा वाढवणे आवश्यक
खर्च विभागाकडून 7 जुलै 2017 ला जारी आदेशात म्हटले होते की, डीए 25 टक्केपेक्षा जास्त झाला तर एचआरए सुद्धा सुधारित करण्यात येईल. अशावेळी 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता वाढून 28 टक्के झाला आहे तर एचआरए सुद्धा वाढवणे आवश्यक आहे.

कुणाला किती जास्त मिळेल HRA
केंद्रीय कर्मचार्‍यांना शहराच्या वर्गवारीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए दिला जात आहे. ही वाढ सुद्धा डीएसोबत 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आली आहे. हाऊस रेंट अलाऊन्सची कॅटेगरी X, Y, Z क्लास शहरांच्या हिशेबाने आहे.

 

इतका मिळेल एचआरए

सोप्या शब्दात सांगायचे तर एक्स कॅटेगरीच्या केंद्रीय कर्मचार्‍यांना आता 5400 रुपये महिन्यापेक्षा जास्त एचआरए मिळेल.
यानंतर वाय क्लास शहरातील कर्मचार्‍यांना 3600 रुपये महिना
आणि झेड क्लास शहरातील कर्मचार्‍यांना 1800 रुपये महिना जास्त हाऊस रेंट अलाऊन्स मिळेल.

वाढलेल्या वेतनाचे गणित समजून घ्या
सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे.
सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 15000 रुपयांपासून सुरू आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 18,000 रुपयांच्या मुळ वेतनावर 3060 रुपयांचा महागाई भत्ता जून 2021 पर्यंत 17 टक्केच्या दराने मिळत होता.
जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 28 टक्केच्या हिशोबाने दरमहिना 5040 रुपये मिळणार आहेत.
या आधारावर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात 1980 रुपयांची वाढ झाली.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission government employees will get double bonus in september 2021 da hra salary hike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LPG Cylinder Update | जुन्या LPG सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, किंमत जवळपास सारखीच; जाणून घ्या फायदे?

Maharashtra Health Dept Exam | आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Harmful Effects of Nail Polish | जीवघेणे ठरू शकते नेलपेंट लावणे, जाणून घ्या यामुळे होणारे गंभीर नुकसान