Pune Rural Police | हातात कुऱ्हाड घेऊन हॉटेल, परमिट बारमध्ये चोरी करणारा सुशिक्षीत चोरटा गजाआड, पुणे ग्रामीण पोलिसाकडून 12 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | रात्रीच्या वेळी बंद केलेल हॉटेल, परमिट बार मध्ये घरफोडी व दिवसा वाहन चोरी करणाऱ्या सुशिक्षीत अट्टल चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 12 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आदित्य बाळासाहेब कवडे (वय-21 रा. कोळगाव मानमोटी घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Rural Police)

रात्रीच्या वेळी बंद केलेले परमिट बार हॉटेलची खिडकी, दरवाजे उचकटून आत प्रवेश करुन रोख रक्कम व दारुच्या बाटल्यांची चोरी झाल्याच्या पाच घटना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. प्रत्येक घटनेत एक व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन चोरी करत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

एलसीबीच्या पथकाने घटनास्थळांना भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व घटनांमध्ये एक व्यक्ती चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनाक्रम व घटनास्थळ तपासले असता चोरी करणारा व्यक्ती चोरी करुन दौंड-काष्टी बाजूकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाने काष्टी परिसरात आरोपीचा शोध घेऊन अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उच्चशिक्षीत असून त्याने यवत, बारामती, श्रीगोंदा परिसरातील हॉटलमध्ये चोरी केल्याचे तसेच दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

आरोपीकडे केलेल्या तपासात रोख रक्कम व तीन दुचाकी असा एकूण 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला असून 12 गुन्हे उघडकीस आले आहे. अटक केलेल्या आरोपीकडून यवत पोलीस ठाण्यातील -5,
बारामती तालुका व श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील -प्रत्येकी 2, बारामती शहर, दौंड, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती विभागाचे उपविभागीय
पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ,
पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे,
अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, आसीफ शेख, अजित भुजबळ, निलेश शिंदे, राजू मोमीण, अतुल डेरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून तरुणाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रोडवरील घटना

Pune Katraj News | पीएमटी महिला कंडक्टरची प्रवासी महिलेला मारहाण, कात्रज बसस्टॉप येथील घटना

Pune BJP On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर म्हणजे हवा भरलेला फुगा, टेंपररी आमदार – भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे

Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे 18 ते 20 जानेवारीला आयोजन (Video)

लाइट कट करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Pune Chronic Garbage Spots | पुण्यात कचरा टाकण्यात येणारे आणि साठला जाणारे नऊशे ‘क्राॅनिक स्पाॅट’ ! 161 ‘स्पाॅट’ कचरा मुक्त करण्यास महापालिका प्रशासनाला यश