संतापजनक ! पुण्यातील सदाशिव पेठेत अभ्यासिकेत निघालेल्या विद्यार्थीनीकडं पाहून युवकाचे ‘हस्तमैथुन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गजबजलेल्या मध्यवस्थीमधील सदाशिव पेठेत अज्ञात लिंगपिसाट नराधाम स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थिंनीकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच दिवसात दुसरी घटना घडली असून, यामुळे विद्यार्थिंनीच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी 25 30 वयोगटातील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करते. ती सदाशिव पेठेतील एका अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येते. दरम्यान अभ्यासिका दुसर्‍या मजल्यावर आहे. दोन दिवसांपुर्वी तरूणी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जिन्यावरून अभ्यासिकेत जात होती. त्यावेळी नराधम पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या पाठिमागे जिन्यांमध्ये आला. तसेच, तरूणीचे लक्ष वेधून तिच्याकडे पाहून अश्लील संभाषण करत हस्तमैथून केले. तरूणी भिती पोटी तेथून पळाल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.

पाच दिवसांतील ही दुसरी घटना असून, यापुर्वीही दोन तरूणी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खासगी क्लासला जात असताना 25 ते 30 वयोगाटीतल लिंगपिसाट तरूण रस्त्याच्या कडेला उभा राहून त्यांच्याकडे पहात हस्तमैथून करत होता. तसेच, अश्लील आवाज काढत त्यांच्याकडे पाहून हावभाव करत असल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा असाच प्रकार घडला आहे.

मध्यवस्थीतच दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने विद्यार्थिंनीमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. अद्याप पोलीसांना हा लिंगपिसाट तरूण सापडलेला नाही. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.