Pune : शहरात चंदन चोरणार्‍या टोळ्या सक्रिय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात चंदन चोऱ्या करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या असल्याचे दिसून येत असून, मंगलदास रस्त्यावर टाटा मॅनेजमेंट सेंटरमधील दोन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी चंद्रकांत नवले (वय ५९, रा. वडगाव शेरी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मॅनेजमेंट सेंटरमध्ये काही चंदनाची झाडे आहेत. काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सेंटरमध्ये प्रवेश केला. दोन चंदनाची झाडे तोडून कापून नेण्याचा प्रयत्न केला. सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रशेखर खोत करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एफसी कॉलेजच्या आवारातून देखील चंदनाची झाडे चोरून नेली होती. त्यात आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चंदन चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे.