Pune : शिवाजीनगरमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात सराईताला अटक, पाऊण किलो सोनं जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. सराईत गुन्हेगाराने हे घरफोडले होते. त्याच्याकडून 12 लाख 60 हजार रूपये किंमतीचे 28 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

जयवंत गोवर्धन गायकवाड उर्फ जयड्या (वय ३२, रा. आंबेडकर वस्ती, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जयड्या सराईत असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान शिवाजीनगर परिसरात गेल्या आठवड्यात (दि. २२ मार्च) बंद फ्लॅट फोडून घरफोडी केली होती. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, डॉलर असा मुद्देमाल चोरून नेला होता. वाढत्या घरफोडीच्य अनुषंगाने गुन्हे शाखा पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कारागृहातून सुटलेला आरोपी जयवंत गायकवाड याने एक मोठी घरफोडी केली असून तो सोलापूरला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिवाजीनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी जयाड्या हा सराईत असून तो एकट्यानेच ही घरफोडी केली आहे. बंद फ्लॅट फोडून तो घरफोड्या करत असल्याचे आढळून आले आहे.

उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.