सातारा रोडवरील भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू ; २ गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे-सातारा रोडवर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव मोटरसायकलने दुसऱ्या मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e7e3922-bd4d-11e8-ab01-d9aa50a43cfa’]

ट्रिपल शीट दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला उडवले

ट्रिपल शीट निघालेल्या मित्रांच्या दुचाकीने दुसऱ्या एका दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात दोन मित्र जागीच ठार झाले आहेत तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

उदय पाटील (२५, रा. धुळे ) व रोहित दिनेश पाटिल (२४, मुळ रा. नंदूरबार) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर राहुल लोटन कणखर (२६, नंदुरबार) हा जखमी झाला आहे. तसेच दुसऱ्या दुचाकीवरिल सन्नी रणजितकुमार शर्मा (३४, रा. आंबेगाव) हे ही गंभीर जखमी झाले आहेत.

औषधांची ऑनलाईन विक्री, देशभरातील केमिस्टकडून २८ सप्टेंबरला बंदची हाक

गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास जखमी सन्नी शर्मा व त्याचा मित्रासोबत जेवण करुण ट्रेझर पार्क सोसायटीकडून सातारा रोडला येऊन स्वारगेटच्या दिशेने जात होते. त्या दरम्यान पाठीमागून भरधाव दूचाकी चालवत आलेल्या उदयने जबर धडक दिली. या भीषण अपघतात दोघांचा मृत झाला. तर दोघे जखमी झाले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.