शाळकरी मुलीला ‘अ‍ॅसिड’ हल्ल्याची धमकी, अत्याचार केल्यानंतर व्हिडीओ ‘व्हायरल’ ची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शाळकरी मुलीचा सतत पाठलागकरून तिला अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकी देत तिला वाघोली परिसरात नेहून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या 35 वर्षीय आईने कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतिक आंध्रे (वय 25) याच्यावर विनयभंग, पॉस्को, बलात्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी कोरेगांव पार्क परिसरातील एका शाळेत शिकते. ती शाळेत जाताना आणि शाळेतून वापस येत असताना तिचा पाठलाग करत असे. तिला चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकण्याची आणि घरच्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला शेवटचे एकदा भेटण्यास सांगितले. पिडीत मुलगी आल्यानंतर तिला दुचाकीवर जबरदस्तीने वाघोली परिसरात नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर तिला अत्याचाराचा व्हिडीओ बनविला असून कोणाला सांगितल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अधिक तपास कोरेगांव पार्क पोलीस करत आहेत.