Pune School News | पुण्यातील नामवंत शाळेने फी भरली नाही म्हणून 150 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; पालक संतप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune School News | पुणे शहराला विद्येचे माहेरघर असे संबोधले जाते. मात्र याच पुण्यात शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना (Students) वर्गाबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या पहिल्यांच दिवशी फी (School Fees) भरली नाही म्हणून दहावीच्या (10th) तब्बल 150 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. पुण्यातील पर्वती परिसरातील नामांकित मुक्तांगण शाळेत (Muktangan School) हा सर्व प्रकार घडला असून यावर सर्व स्तरांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. (Pune School News)

 

आजपासून जून (June) महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्यात सर्वत्र पालकांची (Parents) व विद्यार्थ्यांची शालेय तयारीची व शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरु होते. मात्र सध्या महागाईच्या (Inflation) काळात काही पालकांना शाळेची वाढलेली भरमसाठ फी लगेच पहिल्या महिन्यात भरणे शक्य होत नाही. शाळा १५ तारखेपासून सुरु होत असल्या तरी आजपासून दहावीचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू झाले आहेत. मुक्तांगण शाळेतही आजपासूनच दहावीचे ज्यादाचे तास सुरु झाले. मात्र अगदी पहिल्याच दिवशी फी (Muktangan School Fees) न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. या प्रकरणावर सर्व पालक संतप्त झाले असून, शाळेला या संदर्भात पालकांनी शाळेत जात तेथील व्यवस्थापकाला जाब विचारला. त्यावेळी सगळ्यांनी शाळा प्रशासनाकडून मिळालेल्या आदेशाचं पालन करत असल्याचे पालकांना सांगितले आहे. (Pune School News)

या प्रकरणामुळे संतप्त पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली होती. यावेळी स्थानिक राष्ट्रवादी (NCP) नेते नितीन कदम (Nitin Kadam) त्यांनी देखील शाळेमध्ये जात व्यवस्थापनाला जाब विचारला. नंतर शाळेने समोपचाराची भूमिका घेऊन उपस्थित पालकांची समजूत काढली आणि फी भरण्यासाठी मुदत वाढवून दिली. त्यानंतर काही वेळाने पालक आणि शाळा प्रशासनाचा हा वाद मिटला.

 

मात्र शाळा प्रशासनाने फी न भरण्यावरुन विद्यार्थ्यांना दिलेली ही वागणुक निंदनीय आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात पहिल्या दिवशीच फी भरणे शक्य होत नाही.
फी भरण्यासाठी मुदतवाढ करणे किंवा फी टप्याटप्याने भरून देणे असे सहकार्य शाळेने करणे अपेक्षित असते मात्र,
शाळेने विद्यार्थांसोबत केलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थांना त्रास तर होतोच त्यांच्या मनावरही याचा वाईट परिणाम होतो.

 

Web Title :  Pune School News | Famous school in Pune expels 150 students for non-payment of fees; Parents are angry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा