Pune Sinhagad Road Police | सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, पिस्तुल व काडतुस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Police | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून पिस्टल (Pistol Seized) आणि जिवंत काडतुस जप्त केले. त्याच्याकडून 45 हजार रुपये किंमतीचे पिस्टल आणि 500 रुपयांचे एक काडतुस जप्त केले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी ही कारवाई नऱ्हे (Narhe) येथील स्वामीनारायण मंदिराच्या (Swami Narayan Mandir Pune) बाजुच्या सर्व्हिस रोडवर केली.

साईनाथ बंडु आडे (वय-19 रा. जे.एस.पी.एम. कॉलेज जवळ, नऱ्हे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी, अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना माहिती मिळाली की, नऱ्हे येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूच्या सर्विस रोडवर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकजण उभारल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्टल व एक काडतुस असा एकूण 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक गुन्हे राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)