Pune : अनाधिकृत बांधकामाला विरोध केल्यानं टोळक्याकडून सोसायटीच्या सेक्रेटरी आणि महिला उपाध्यक्षास मारहाण, येरवडयात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सोसायटीच्या आवारात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याने आठ ते नऊ जणांनी सोसायटीचे सेक्रेटरी व महिला उपाध्यक्षणा मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. येरवडा परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी कपिल पांडे (वय 43) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरटीओ परिसरात हरिगंगा सोसायटीचे असून, त्याचे फिर्यादी हे सेक्रेटरी आहेत. यावेळी प्रताप साळुंखे हा सोसायटीच्या आवारात अनधिकृत बांधकाम करत होता. यामुळे फिर्यादी यांनी त्याला विरोध केला. तसेच बांधकाम थांबविण्याची विनंती केली. त्यावेळी आरोपीने चिडून जात वाद घालण्यास सुरुवात केली. तर हा वाद सुरू झाल्यानंतर सोसायटीच्या महिला उपाध्यक्षा आल्या. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने साथीदाराना बोलवत फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्याना मारहाण केली. यात महिला उपाध्यक्षा जखमी झाल्या आहेत. वाद मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

You might also like