पुणे- सोलापूर रोडवर सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाट्यावर 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे- सोलापूर रोडवर सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाट्यावर दोन वेगवेगळ्या अपघातात 6 जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पहिल्या अपघातात रविवारी रात्री साडेआकरा वाछता सहजपूर फाट्यावर ररस्तावरील दुभाजक तोडून कंटेनरने स्विफ्ट कारला धडक दिली. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. काशीनाथ नागनाथ बंदीछोडे आणि आदीत्य बंडू खडसोळे अशी दोघांची नावे आहेत

दुसर्‍या अपघातात कासुर्डी फाट्यावरील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कंटनेरला पाठीमागून सांट्रो कारने धडक दिली. झालेल्या या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे – सिध्देश्वर चंद्रकांत बर्डे,अनिता सिध्देश्वर बर्डे,संतोष मल्लीनाथ पाटील,शोभा शरनगोंडा पाटील ( सर्व रा. कोंढवा). तर श्वेता सिध्देश्वर बर्डे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्यावर यवत ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like