धक्कादायक ! नव्यानेच लग्न झालेल्या नवरदेवाची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी तसेच सासू-सासरे आणि मेव्हणी व मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून एका नवविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील काळेपडळ भागात हा प्रकार घडला आहे.

सतीश बापू गायकवाड (वय 22, रा. ससाणेनगर, हडपसर, मूळ करमाळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पूनम उर्फ स्वाती गायकवाड (पत्नी) , मल्लेश (सासरे), चेतन (मेव्हणा), सोनाली (मेव्हणी ) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्योती गायकवाड (वय 50, रा. साडे, करमाळा ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश व पूनम यांचा सातच महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. सतीश एका मेडीकलमध्ये नोकरी करत होता. लग्नानंतर काही दिवसांमध्ये सतीशच्या सासुरवाडीचे लोक त्याला मानसिक त्रास देउ लागले. तुला मुलगी देऊन पश्चाताप झाला आहे. आमच्या नातेवाईकांमध्ये मुलीचे लग्न केले असते तर चांगले झाले असते. असे टोमणे सासरे मल्लेश यांच्यासह मेव्हणा चेतन, मेव्हणी सोनाली मारत होते. तसेच पत्नी पूनमनेही सतीशला अपमानास्पद बोलणी सुरु केली. त्यामुळे सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून सतीशने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/