पुणे  : शरीर सुखास नकार देणाऱ्या काकूची पुतण्यानेच केली हत्या

पुणे (मंचर) : पोलीसनामा ऑनलाईन

आरोग्य सेविका असलेल्या काकूकडे पुतण्याने शरिर सुखाची मागणी केली. परंतू काकूने त्याला नकार दिल्याने चिडलेल्या पुतण्याने काकूचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची घटना जुन्नरमध्ये घडली आहे. हि घटना आज (बुधवार) पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. संगीता देविदास साळवे, असे खुन झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी पुतण्या शिवाजी गेणू साळवे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. देविदास साळवे यांनी मंचर पोलीसांत फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’1786491990′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f621af0d-7a13-11e8-b8b2-9b3622c0bf28′]

मंचर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्य़ादी देविदास साळवे यांच्या पत्नी आरोग्य सेविका म्हणून काम करतात. काल रात्री मयत संगीता या  घराच्या ओट्यावरील कॉटवर झोपल्या होत्या. तर त्यांचा मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी हे दोघे घरामध्ये झोपले होते. तर देविदास हे आई आजारी असल्याने बहिणीच्या घराशेजारील खोलीत झोपले होते. आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास देविदास यांना पत्नी संगीता यांचा मला वाचवा असा आवाज ऐकू आला. तिच्या आवाजाने देविदास पत्नीच्या दिशेने धावत गेले असता, पुतण्या शिवाजी गेणू साळवे हा संगीता यांच्यावर हत्याराने वार करत होता. देविदास यांना येताना पहाताच शिवाजी हा आंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

जखमी अवस्थेत असलेल्या संगीता यांनी सांगितले की, “शिवाजी याने मला झोपेतून उठवून शरीर सुखाची मागणी केली. त्याला नकार दिल्याने त्याने चिडून जाऊन माझ्यावर वार केले.” आरोपी शिवाजी याने संगीता यांच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर आणि पायावर वार केले. जखमी अवस्थेत संगीता यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी प्राथमीक उपचार करुन नारायणगाव येथील रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.