शहरात चोरट्यांची दहशत, डोक्यात दगड घालून चिल्लर लांबवले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात फक्त अन् फक्त चोरट्यांचीच दहशत निर्माण झाली असून पीएमटी, पादचारी आणि दुचाकीस्वारांना लुटले जात असतानाच डेक्कन सारख्या उच्चभ्रू परिसरात संभाजी पुलाखाली (लकडी पुला खाली) भिक्षेकऱ्याच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या जवळील चिल्लर चोरण्यासाठी हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान भिक्षेकरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत.

जॉन बाबा असे या भिक्षेकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन बाबा हा डेक्कन परिसरात भिक्षा मागत फिरत असे. तो याच परिसरात पुला खाली किंवा एखाद्या कोपऱ्यात राहत होता.

दरम्यान, शहरात सध्या फक्त लुटमारी करणाऱ्या चोरट्यांची चलती आहे. रात्री, दिवसाही हे चोरटे पादचारी, दुचाकीस्वार आणि नागरिकांना लुटले जात आहे. मध्यरात्री दोन खून आणि इतर गंभीर गुन्हे दाखल असणारा गुंड रिक्षा चालवून साथीदारांच्या मदतीने प्रवाशांना शास्त्राच्या धाकाने लुटले जात आहे.
दुसरीकडे गेल्या काही महिन्यात पीएमटी बसमधील चोरीचे सत्र थांबन्याची चिन्हे नाहीत. महिलांना लक्ष करून हातातील बांगडी, गळ्यातील दागिने चोरले जात आहेत. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असणारे हे सत्र पोलिसांना थांबवता आलेले नाही. त्यात लूटमार कायम असून, अगदी मोबाइलसाठी चोरटे मारहाण करत आहेत. आता या चोरट्यांचा कहर झाला आहे.

एका भिक्षेकऱ्याजवळील रोकड चोरण्यासाठी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या जवळील रोकडही चोरीला गेली आहे. अद्याप ही या चोरट्यांचा पत्ता किंवा माग पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे शहरात फक्त अन् फक्त चोरट्यांचीच दशहत निर्माण झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –