पुन्हा बसमध्ये महिलेची सोन्याची बांगडी चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पीएमपीएमएल बसमध्ये चोर्‍या करणार्‍या टोळ्यांनी हैदोस घातला असून, पुन्हा एकदा स्वारगेट परिसरात पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना ज्येष्ठ महिलेच्या हातातील बांगडी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी 71 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी या रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पतीसोबत कामानिमित्त स्वारगेट परिसरात आल्या होत्या. परत जात असताना त्या स्वारगेट येथील कात्रज बस स्टॉपवर थांबल्या. बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील 40 हजार रुपयांची बांगडी चोरून नेली. काही वेळातच त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –