सोने खरेदीसाठी आली अन् अंगठ्या चोरून गेली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोने खरेदीसाठी सराफाच्या दुकानात आलेल्या महिलेने नजर चुकवून 50 हजार रुपयांच्या दोन अंगठ्या चोरुन नेल्याची घटना लष्कर परिसरात घडली. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.

रामराज दुबे (वय 26, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर परिसरातील खरी पेढी ज्वेलसमध्ये रामराज कामाला आहेत. सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सोने खरेदीच्या बहाण्याने एक महिला जेल्वर्समध्ये आली. तिने रामराजला विविध नक्षीकाम असलेल्या अंगठ्या दाखविण्याची मागणी केली. अंगठ्या दाखविताना महिलेने रामराजची नजर चुकवित 50 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या चोरुन नेल्या. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हरिष शिळीमकर अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –