पुणे पोलीस दलातील 21जणांना ‘कोरोना’ची लागण, 10 जण बरे झाले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूत असून, चोवीस तास तैनात असणाऱ्या पुणे पोलिस दलातील तब्बल 21 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 10 पोलिस पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. 3 हजाराच्या जवळ पोहचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस दल काम करत आहे. शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी नागरिकांनी बाहेर पडू नये तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तसेच, या ठिकाणच्या पोलिस चौक्या देखील बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान कर्तव्य बजावताना सुरवातीला मध्य वस्तीमधील पोलिस ठाण्याच्या एका कर्मचारी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच पोलिस ठाण्यातील 8 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. तसेच, ते पोलिस ठाणे पूर्ण क्वारनटाईन करण्यात आले होते.

शहरातील ही संख्या आता वाढत असताना पाहिला मिळत आहे. बंदोबस्त करत असताना शहर पोलिस दलातील वेगवेगळ्या परिसरातील २१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. चांगली बाब म्हणजे त्यापैकी 10 पोलिस पूर्णपणे बरे झाले आहेत. दुर्दैवाने एका सहायक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे शहरातील कर्मचारी तसेच क्वाराटाईन व कोरोना झालेल्या कर्मचारी यांची काळजी घेणे, त्यांना उपचार तसेच लागेल ती मदत करण्यात येत आहे.