सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुचर्चीत उड्डाण पूल पाढण्याचे काम अखेर सुरू, वाहतुकीत बदल

पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुचर्चीत उड्डाण पूल पाढण्याचे काम अखेर सुरू करण्यात आले. आज या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक बदलण्यात आली. त्यामुळे हे काम पूर्ण होइपर्यंत वाहन चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. पहिल्या टप्यात पाषाणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा भाग पाडण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक बदल केले गेले आहेत.

पहिला टप्पा वाहतूक बदल

औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहिल. शिवाजीनगरकडून औंध, बाणेरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहिल. शिवाजीनगरकडून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी उड्डाणपुलावरुन बाणेरकडे जावे. तेथून अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर चौकात वळावे. तेथून पाषाणकडे जावे. सेनापती बापट रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहिल. सेनापती बापट रस्त्यावरुन पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी अनगळ लेनमार्गे गणेशखिंड रस्ता गणपती मंदिरमार्गे विद्याापीठ चौकात यावे. तेथून पाषाण,औंध, बाणेरकडे जावे.

दुसरा टप्पात बाणेरकडे उतरणारा उड्डाणपुलाचा भाग पाडण्यात येणार आहे.

औंध, बाणेर, पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहिल. शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहिल. शिवाजीनगरकडून पाषाणकडे जाणाºया वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता चौक, विद्याापीठ चौकात येऊन पाषाणकडे जावे. शिवाजीनगरकडून बाणेरकडे जाणाºया वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता चौक, वैकुंठ मेहता संस्था, विद्याापीठ चौकात यावे. तेथून पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी पाषाण चौकातून उजवीकडून वळून बाणेर रस्त्यावर यावे.

तिसऱ्या टप्यात औंधकडे जाणारा उड्डाणपुलाचा भाग पाडण्यात येणार आहे.

औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहिल. शिवाजीनगरकडून पाषाण, बाणेरकडे जाणाºया वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता चौक, विद्याापीठ चौकमार्गे पाषाण किंवा बाणेरकडे जावे. शिवाजीनगरकडून औंधकडे जाणाºया वाहनांनी रेंजहिल्स चौकातून रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता, विद्याापीठ चौकातून बाणेर रस्त्याने बाणेर फाटा चौकात यावे. तेथून औंधकडे जावे.

चौथ्या टप्यात उर्वरित उड्डाणपुल पाडण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्याापीठ चौकातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणाºया वाहनांनी अभिमानश्री सोसायटी चौकातून डावीकडे वळून बाणेर रस्त्यावर यावे. तेथून शिवाजीनगरकडे जावे. औंध रस्ता, बाणेर रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहिल. शिवाजीनगरकडून औंध रस्ता, पाषाण, बाणेरकडे जाणाºया वाहनांनी रेंजहिल्स चौक, विद्याापीठ चौक मार्गे औंध,पाषाण, बाणेरकडे जावे.