Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नववर्षाचे स्वागत (Happy New Year) प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यातील मध्यवस्थीत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) दर्शनासाठी हजारो भावीक येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) वाहतुकीत बदल केले आहे. दि. 1 जानेवारी रोजी दरम्यानच्या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करवा असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) करण्यात आले आहे.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (Chhatrapati Shivaji Maharaj Road) शनिवारी (1 जानेवारी) सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shriram) यांनी दिली.

पर्यायी रस्ता – बाजीराव रस्त्याने (Bajirao Road) शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने (Tilak Road) अलका चित्रपटगृह चौकमार्गे (Alka Chowk) डेक्कन जिमखान्याकडे (Deccan Gymkhana) जावे. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे (Swargate) जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

 

 

Web Title :- Pune Traffic Police | Shivaji Road closed to traffic on Saturday (tomorrow)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

Pune Corporation | पुणे महापालिका ‘अलर्ट’ ! कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; बेडस्, औषधे आणि ऑक्सीजनची सुसज्जता

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 % उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न

Restrictions in Maharashtra | राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?, जाणून घ्या सविस्तर

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता