TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. त्यानंतर आता अटकेत असलेल्या निलंबित (Suspended) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे (Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe) याच्या ड्रायव्हरला (Driver) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

 

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) तुकाराम सुपे यांचा ड्रायव्हर सुनील घोलप (Sunil Gholap) याच्यासह मनोज डोंगरे (Manoj Dongre) याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती अधिक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. तुकाराम सुपे याने पाठवलेले विद्यार्थ्यांची नावे (Student Name) आणि हॉल तिकिट (Hall Ticket) अन्य आरोपींना पाठवण्याचे काम सुनील घोलत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सुनील घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेत (Teacher Eligibility Test) इतर आरोपींसोबत संगनमत करुन अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पास केले. यासाठी त्याने कोट्यावधी रुपये घेतल्याची माहिती आहे.

अटक करण्यात आलेला तुकाराम सुपे हा त्याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर विद्यार्थ्यांची नावे त्यांची हॉल तिकीट पाठवत असल्याचे उघड झाले आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुनील घोलप याच्याकडून तुकाराम सुपे याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

 

 

Web Title :- TET Exam Scam | Pune Police Arrested Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supes Driver in TET Exam Scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corporator Archana Tushar Patil | प्रभागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरु करा; भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणी

 

Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना

 

Pune Crime | पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस ! कोयत्याने वार करुन तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

 

Omicron Covid Variant | गेल्या 24 तासात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 190 नवीन रुग्ण ! राज्यात 450 पैकी 125 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात, जाणून घ्या आकडेवारी