Pune Traffic Updates News | गणेशखिंड रोडवरील वाहतूक पूर्ववत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates News | विद्यापीठ चौकात मेट्रोकडून उड्डाण पुलाच्या कामाचे नियोजन असल्याने आणि या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) पुणे विद्यापीठ चौक व गणेश खिंड रस्ता परिसरातील वाहतूकीत बदल करण्याचे (Changes in Traffic) नियोजन केले होते. मात्र, आता गणेशखिंड रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्याचा (Pune Traffic Updates News) निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Traffic DCP Vijay Kumar Magar) यांनी दिली.

 

मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले जाणार असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक व परिसरामधील वाहतूकीत बदल करण्याचे आदेश 8 फेब्रुवारी रोजी काढण्यात आले होते. मात्र मात्र पुणे शहरात वारंवार व्ही.व्ही.आय.पी./ व्ही.आय.पी. यांचे पुणे दौरे होत असल्याने व चतु:श्रृंगी, शिवाजीनगर, खडकी वाहतूक विभागातील वाहतूकीची परिस्थिती पाहता गणेशखिंड रोडवरील वाहतूक पुर्ववत करण्याचा निर्णय पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. तसा नवा आदेश बुधवारी काढण्यात आला आहे.

 

जुन्या आदेशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Savitribai Phule Pune University Chowk),
बाणेर रस्ता (Baner Road), पाषाण रस्ता (Pashan Road), गणेशखिंड (Ganesh Khind) आणि
सेनापती बापट (Senapati Bapat) रोड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता.
मात्र आता हा आदेश काही काळाकरता रद्द करुन गणेशखिंड रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Traffic Updates News | Traffic restored on Ganeshkhind Road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या