Pune : पुणे अ‍ॅन्टी करप्शनचा तिहेरी दणका ! 9 लाखाच्या लाच प्रकरणी बडा अधिकारी ACB च्या ‘रडार’वर; पुण्यातील वकिलासह शिरूर आणि तळेगाव दाभाडे येथे कारवाई, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्याच्या लाच लुचपत विभागाने आज तिहेरी कारवाई करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून, यात एका मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. शिरूर, तळेगाव दाभाडे व पुण्यातील एका वडिलाचा समावेश आहे.

Devendra Fadnavis on Maratha Reservation : ‘मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय’

पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येथील पालिकेचे मुख्याधिकारी शाम पोशट्टी (सीओ) आणि आणखी एका अधिकाऱ्याने 9 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. तक्रारीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने आज डिमांडचा (लाचेच्या मागणीचा) गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पकडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

‘कोविड योद्धे बनून बाहेर पडा’ ! CM ठाकरेंच्या सल्ल्यावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पाहिल्या कारवाईत शिरुर येथील शिवाजी महादु गव्हाणे (वय 56) यांना पकडले आहे.  शिवाजी हे शिरूरमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक शिवाजी यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तकरार केली होती. त्यानुसार आज कारवाईत तडजोडीनंतर 15 हजार रुपये घेताना पकडले आहे.

नाशिककरांसाठी मोठी बातमी ! Lockdown ‘शिथिल’

तर दुसऱ्या कारवाईत एका वकिलाला 10 हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. हरिकिसन श्रीरामजी सोनी (वय ५७) असे पकडण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ममता बॅनर्जींनी मुख्य सचिवांना दिला स्पष्टच आदेश, म्हणाल्या – ‘मोदी सरकार बुलाती है, मगर जाने का नहीं !’

यातील महिला तक्रारदार यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा वाद सुरू आहे. केसमध्ये शासनाने लोकसेवक सोनी यांना वकील म्हणून नेमले आहे. यावेळी त्यांनी 20 हजार रुपयांची लाच तक्रारदार महिलेकडे केली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यात पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज 10 हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.