Pune Wanwadi Crime | पुणे : रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याच्या कारणावरुन मारहाण, एकला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | रोडच्या कडेला आडोशाला लघुशंका करणाऱ्या एका व्यक्तीला शिवीगाळ करुन धारदार वस्तूने मारहाण (Marhan) करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास शिंदे छत्री (Shinde Chatri)जवळ असलेल्या नुरानी कब्रस्तान (Noorani Kabrastan) लगत असलेल्या रोडच्या कडेला घडला.

याबाबत प्रमोद पतंगराव पाटील (वय-46 रा. सोपान बाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शामीक झाकीर शेख (वय- 27 रा. वानवडी बाजार, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वानवडी येथील साईट व्हिजीट करुन घरी जाण्यासाठी शिंदे छत्रीकडून मेन रोडला येत होते. त्यावेळी रोडच्या कडेला आडोशाला लघुशंका करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन वाद घालून धारदार वस्तुने कानावर मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Wanwadi Crime)

भांडण सोडवल्याच्या रागातून मारहाण

कोंढवा : व्हिआयटी जवळ झालेली भांडणे सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून एका तरुणाला दोघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) रात्री दीडच्या सुमारास कोंढवा स्मशानभूमी जवळ घडला. याप्रकरणी सागर विलास पंधरकर (वय-28 रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन तम्या, अविष्कार माने (दोघे रा. कोंडवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हि.के. बाबर करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यावर चाकूने हल्ला, येरवडा परिसरातील घटना

Pune Cheating Fraud Case | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”