Pune Water Crisis | पुणे: पाण्याच्या बिलासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करू – आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Crisis | शहराला हाेणाऱ्या पाणी पुरवठ्याकरीता पाटबंधारे विभागाने (Maharashtra Irrigation Department) महापािलकेकडे Pune Municipal Corporation (PMC) पावणे आठशे काेटी रुपयांची मागणी केली आहे. ही आकारणी औद्याेगिक दराने केली असुन, त्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची माहीती आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली.

महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाने २०२३-२४ साठी १२.४० टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. त्यानुसार, मंजूर पाण्यासाठी महापालिकेस १ पट दराने शुल्क आकारले जाते. मात्र, महापालिका मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याने पाटबंधारे विभागाने पालिकेस दीड पटीने दंड लावला आहे. त्यातच, महापालिकेकडून शहरात केवळ पिण्यासाठी पाणी दिले जात असताना पाटबंधारे विभागाने उद्योगासाठी महापालिका या पाण्यातील १२.५० टक्के पाणी देते असे गृहीत धरत पालिकेस दोन महिन्यांपूर्वी सुमारे ६८२ कोटींची मागणी केली होती.

त्यानंतर महापालिकेने याबाबत वारंवार पाटबंधारे विभागास पत्र देत महापालिका केवळ पिण्यासाठी पाणी देते पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महापालिकेचे पाण्याची थकबाकी तसेच नवीन बील कमी होणे अपेक्षित असताना महापालिकेस सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची बिले ही औद्योगिक दराने पाठवली आहेत. बिले औद्योगिक दराने काढून एकूण थकबाकीसहित ७३६ कोटी देण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे, महापालिकेचा वार्षिक वापर १८ टीएमसी पकडला तरी पालिकेस एका टीएमसीसाठी तब्बल ४० ते ४१ कोटी रुपये प्रत्येक महिन्याला मोजावे लागत आहे.

यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाकडून औद्याेगिक दराने पाण्याचे बिल आकारले जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा केली जाईल. पीएमआरडीएच्या विकास आराखड्यासंदर्भात बैठक हाेत असुन, त्यावेळी पाण्याच्या बिलाचा विषयावर चर्चा केली जाईल.’’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

पिंपरी : ‘तु माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?’ पत्नीला लाटण्याने मारहाण, पती विरोधात FIR

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार