
Pune Water Supply | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील पाणी कपात मागे; उद्यापासून अंमलबजावणी, पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय (व्हिडिओ)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पाणी कपातीचा (Water Cut) सामना करावा लागत आहे. त्यातच जून महिना कोरडा गेल्याने पुणेकरांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील (Dam) चारही धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील पाणी कपात (Pune Water Supply) रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या पासूनच होईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा नियोजनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे अधिकारी वर्गासोबत बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), चंद्रकांत पाटील यांचे विशेष अधिकारी राजेंद्र मुठे (Rajendra Muthe), पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरूध्द पावसकर (Anirudh Pavaskar), अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी (Superintending Engineer Prasanna Joshi), पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) अभियंता श्वेता कुऱ्हाडे (Engineer Shweta Kurhade) आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाणी नियोजनाबाबत मे महिन्यात बैठक झाली होती. त्यावेळी हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. तेव्हा पाऊस उशिरा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आठवड्यामधून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जून आणि जुलैच्या मध्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते.
मात्र, जुलै महिन्याच्या अखेरच्या दहा दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात मोठी वाढ झाली.
त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तसेच ग्रामीण भागातील शेतीकरिता उद्यापासून नियोजित आवर्तन सोडले जाणार आहे.
आता दोन महिन्यांनंतर पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune: DCP Vikrant Deshmukh ordered deportation of 65 Criminals in 7 months