Pune Water Supply | पुण्यातील पाणीटंचाईवर टँकरचा तोडगा, खासगी टँकरचा अधिक बोलबाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे प्रशासकीय विभागातील (Pune Administrative Division) काही जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे तर काही जिल्ह्यात अद्याप मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील सांगली (Sangli), सोलापूर (Solapur) व कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आता तरी एकही टँकर (Tanker) सुरू नाही मात्र, सातारा जिल्ह्यात बारा तर पुणे जिल्ह्यात 33 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. (Pune Water Supply)

गतवर्षी झालेल्या विपुल पावसाळ्यामुळे या वर्षी पाण्याची कमतरता कमी भासत असली तरी पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे यातील फक्त तीन टँकर हे शासकीय (Governmental) असून, उर्वरित 30 टँकर हे खासगी (Private) असल्याची माहिती समोर आली.

पुणे विभागातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात पाणी टंचाई (Water Shortage) निर्माण झाली असून यावर उपाय म्हणून 42 गावे आणि 192 वाड्यांतील 66 हजार 609 नागरिकांना 33 टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.

त्यामध्ये मुख्यत: आंबेगाव (Ambegaon) तालुक्यामध्ये 12 तर जुन्नर (Junnar) आणि खेड (Khed)
तालुक्यात प्रत्येकी नऊ टँकर सुरू आहेत. पाणी पुरवठ्यासाठी 27 विहीर आणि बोअर (Wells And Bores)
प्रशासनातर्फे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. (Pune Water Supply) मात्र, पाण्याच्या टँकरचे हे
खाजगीकरण सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे आहे. खासगी टँकरवर प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे असून, प्रशासकीय टँकरची संख्या वाढवण्याची गरज आहे.

Web Title : Pune Water Supply | Tanker solution to water shortage in Pune, private tankers are more dominant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड : चिखली चौकात भरदिवसा सोन्या तापकीरवर गोळीबार
Pune News | मेट्रो व ठेकेदाराच्या वादात पुणेकर त्रस्त, कर्वेनगर भागातील अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी
NCP Chief Sharad Pawar | मविआमध्ये जागा वाटपाबाबत कोण निर्णय घेणार?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं