Pune Water Supply | पुण्यातील पाणीसमस्या 2-4 दिवसांत मार्गी लागेल – खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे पुणे शहराच्या विविध भागात निर्माण झालेली पाणीपुरवठ्याची (Pune Water Supply) समस्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल असा विश्वास BJP खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी व्यक्त केला. शहरात निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात महापालिका (Pune Corporation) आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांची आज खासदार गिरीश बापट यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट घेतली.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), माजी नगरसेवक प्रकाश ढोरे (Former Corporator Prakash Dhore), माधुरी सहस्रबुद्धे (Corporator Madhuri Sahasrabuddhe), ज्योत्स्ना एकबोटे (Corporator Jyotsna Ekbote), आदित्य माळवे (Corporator Aditya Malve), अमोल बालवडकर (Corporator Amol Balwadkar), स्वप्नाली सायकर (Swapnali Saikar), ज्योती कळमकर (Jyoti Kalamkar), उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar), स्वरदा बापट (Swarada Bapat), सुनील माने (BJP Sunil Mane) उपस्थित होते.

 

खासदार गिरीश बापट म्हणाले, आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या पाच विभागांसाठी तंत्रज्ञांचा समावेश असणारी समिती उद्या नियुक्त केली जाईल. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) दर्जाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात येईल. पाणीपुरवठ्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन (Helpline) सुरू करण्यात येईल. (Pune Water Supply)

बापट पुढे म्हणाले, तांत्रिक (Technical) बाबींमुळे काही भागात कमी आणि कमी वेळा पाणी येते.
याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.
शहरात समान पाणीपुरवठा योजना (Pune 24×7 Water Supply Project) लवकरात लवकर पूर्ण व्हावी
यासाठी सर्व माजी नगरसेवकांना आपआपल्या भागात पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे.
ज्या ठिकाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही त्या ठिकाणी मी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहे. योजनेच्या प्रगतीचा अहवाल मागवला आहे.

 

 

Web Title :- Pune Water Supply | Water problem in Pune will be solved in 2-4 days – BJP MP Girish Bapat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uric Acid And Vitamin C Deficiency | ‘विटामिन-सी’च्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते यूरिक अ‍ॅसिडची समस्या, ‘या’ वस्तूंचा आजच करा आहारात समावेश

 

Crime News | जिजूच्या प्रेमात मेहूणी झाली अंधळी; संधी मिळताच पतीचा काढला काटा

 

Pune Crime | दुर्दैवी ! पत्नीचा आणि मुलाचा प्राण वाचवताना पतीचा मृत्यू, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील घटना