Pune : नवविवाहितेची नदीत उडी मारुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   लग्नानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठीच्या छळास कंटाळून नवविवाहितेने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बोपोडीतील विरक्रांती चौकात घडली.

तिरुमला श्रीधर पिल्ले (वय २७, रा. बोपोडी ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी श्रीधर पिल्ले (वय ३२ रा. बोपोडी ) याच्यासह आई-वडिलांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा लंका (वय ५७, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला आणि श्रीधर यांचे मार्च २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी श्रीधर आणि त्याच्या आई-वडीलांनी तिरुमलला माहेरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यांनी पैशांसाठी तिरुमलाचा शारिरीक व मानसिक छळ केला. त्यास वंâटाळून तिरुमलाने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. अधिक तपास उपनिरीक्षक वैशाली सुळ करीत आहेत.