पाषाणमध्ये टोळक्याची तरुणाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षात मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्याा तरुणाला टोळक्याने बेसबॉल स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी योगेश दीक्षित (वय 42, रा. पाषाण) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश एका खासगी कंपनीत कामाला आहेत. दोन दिवसांपुर्वी ते मित्र विजय गोरखे यांच्या रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने योगेशला बेसबॉल स्टीकने मारहाण केली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.