Pune : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. बालेवाडी येथील पुलावर हा अपघात झाला आहे.

शुभम विनोद गुप्ता (वय २७, रा. नियती एम्पायर, म्हाळुंगे) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विकास गुप्ता (वय ४१, रा. पॅराडीयम सोसायटी, धानोरी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचा शुभम हा चुलत भाऊ आहे. शुभम हा सोमवारी (५ एप्रिल) सकाळी साडेआठच्या सुमारास औंध-बालेवाडी रस्त्याने निघाला होता. धनकुडे फार्मजवळील पुलावर भरधाव वाहनाने शुभमला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजेश माळगावे तपास करत आहेत.