Punit Balan Celebrity Cricket League | पुनीत बालन सेलिब्रिटी लीग मधे मराठी कलाकारांवर लागली लाखांची बोली; पीबीसीएल सीझन 2 चा लिलाव सोहळा दिमाखात संपन्न

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Celebrity Cricket League | | पुनीत बालन सेलिब्रिटी लीग (PBCL) या कलाकारांच्या क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या सीजनचा लीलाव १०० हून अधिक सेलिब्रिटिंच्या उपस्थितीत, मुंबई येथे ताज हॉटेलमध्ये (Taj Hotel Mumbai) संपन्न झाला. पिबिसीएलच्या अंतिम विजेत्यांना जो चषक दिला जाणार आहे, त्याचे अनावरण राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड (Kaillas Gaikwad), जान्हवी धारीवाल बालन (Janhvi Dhariwal Balan) आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), शरद केळकर (Sharad Kelkar), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), प्रवीण तरडे (Praveen Tarde), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव (Vinod Satav) यांनी केले. प्रास्ताविक पीबीसीएलचे प्रवर्तक पुनीत बालन यांनी केले आणि राहुल क्षीरसागर (Rahul Kshirsagar) यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा लिलाव पार पाडला. (Punit Balan Celebrity Cricket League)

 

ADV

११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पुण्यात (Pune News) होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघामध्ये १६ नामवंत कलाकारांचा सहभाग असेल. यामध्ये तोरणा लायन्स या संघाचं नेतृत्व पुनीत बालन, रायगड पँथर्स या संघाचे नेतृत्व प्रवीण तरडे, शिवनेरी रॉयल्स या संघाचे नेतृत्व सुबोध भावे, सिंहगड स्ट्रायकर्स या संघाचे नेतृत्व सिद्धार्थ जाधव, प्रतापगड टायगर्स या संघाचे नेतृत्व शरद केळकर आणि पन्हाळा जॅगवार्सचे नेतृत्व महेश मांजरेकर करणार आहेत.

मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून रोज प्रेक्षकांना भेटणाऱ्या १०० हून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञावर ६ कॅप्टन्सने बोली लावली.
एखाद्या खेळाडूसाठी दोन कॅप्टन्समध्ये रंगलेली चढाओढ जेवढी चुरशीची होती तेवढीच रंजकही होती.
या सोहळ्यात मराठी कलाकारांवर लाखो रुपयांच्या (पॉइंट्स स्वरूपात) बोली लागल्या.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुनीत बालन सेलिब्रिटी लीग साठी कलाकारांचा लिलाव संपन्न झाला.

 

Web Title :- Punit Balan Celebrity Cricket League | Punit Balan celebrity cricket league
enters into Season-2; Grand Auction conducted at Taj Hotel, attended by more than 100 celebrities

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा