Punit Balan Group | लोणी धामणीतील शाळेसाठी पुनीत बालन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त स्कूल बस भेट

पुणे : Punit Balan Group | युवा उद्योजक पुनीत बालन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Punit Balan Birthday) आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावातील शाळेसाठी स्कूल बस (School Bus) भेट दिली आहे. या बसमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करण्यासाठीचा प्रवास सुरक्षित होणार असून या भेटीबद्दल लोणी धामणी ग्रामस्थांनी पुनीत बालन यांचे आभार मानले आहेत. (Punit Balan Group)

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या (Indrani Balan Foundation) माध्यमातून लोणी धामणी गावात अनेक विकासकामे सुरू आहेत. या गावातील शाळेची भव्य अशी इमारत फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याचे तळेही बाधण्यात आले आहे. यामुळे याभागतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. (Punit Balan Group)

याशिवाय गतवर्षी पुनीत बालन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या गावाला रुग्णवाहिकाही (Ambulance) भेट दिली होती. त्यामुळे गावातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त शाळेसाठी आवश्यक असलेल्या बसच्या रक्कमेचा धनादेश लोणी धामणी गावातील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीला सुपूर्द केला. काही दिवसातच ही बस प्रत्यक्षरित्या विद्यार्थांना मिळणार आहे. हा धनादेश स्वीकारताना गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड (Kailash Gaikwad), समन्वयक चेतन लोखंडे (Chetan Lokhande), माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज , खजिनदार बाळासाहेब गायकवाड, सचिव डॉ. अविनाश वाळुंज, सदस्य राजेश वाळुंज हे उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

29 August Rashifal : मिथुन आणि तुळसह या ३ राशीच्या जातकांना मिळेल खुशखबर, वाचा दैनिक भविष्य

Kidney Health | किडनीसाठी लाभदायक आहेत हे ३ लेमन ड्रिंक्स, किडनी होईल क्लीन

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे

Blood Sugar वाढल्याने किडनी फेल होण्याचा धोका! स्वत:ची ‘या’ ५ प्रकारे घ्या काळजी

Womens Diet | महिलांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करणे आवश्यक