Womens Diet | महिलांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करणे आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Womens Diet | वाढत्या वयाबरोबर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. विशेषतः 30 ते 40 वयोगटातील. 40 वर्षावरील महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. वयाच्या 40 व्या वर्षी महिलांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हार्मोन्समध्ये असंतुलन होऊ लागते. हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. (Womens Diet)

 

या काळात तुम्ही काय खात आहात हे अधिक महत्त्वाचे ठरते. प्रोटीने, कार्ब्ज, फॅट, व्हिटॅमिन, खनिजे सर्व आवश्यक आहेत. जर तुम्ही तुमचा आहार बरोबर ठेवला नाही तर ऑस्टिओपोरोसिस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग इत्यादी त्रास देऊ शकतात. अशा स्थितीत महिलांनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. यासाठी महिलांनी काही महत्त्वाच्या पदार्थांचा आहारात समावेश करावा (30 plus women should include some important foods in their diet).

 

महिलांनी या पदार्थांचा करावा आहारात समावेश

1. दही / Yogurt :
दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया आढळतात. तसेच दह्याचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे हाडांसाठी चांगले असते. (Womens Diet)

 

2. लसूण / Garlic :
लसणाचे सेवन सर्व वयोगटातील लोकांनी केले पाहिजे. लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. 40 नंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीत लसूण तुम्हाला वाचवण्याचे काम करतो.

3. अंडी / Eggs :
महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन-डी आणि आयर्न या दोन्ही घटकांची कमतरता असते. महिलांच्या आरोग्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. अंडे महिलांसाठी सर्वोत्तम अन्न आहे.

 

4. नट्स / Nuts :
वाढत्या वयाबरोबर महिलांनी आपल्या आहारात नट्सचा समावेश करावा. नट्समध्ये व्हिटॅमिन, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि फायबर असतात. ते भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यासोबतच अनेक आजारांपासून बचाव करतात.

 

5. आंबट फळे / Sour Fruit :
आंबट फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन सी आणि सर्व प्रकारचे पोषक घटक आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. या वयात महिलांना अनेकदा लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा त्रास होतो. या आजारांमध्ये आंबट फळांचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Womens Diet | with increase in age women should try these diet in their need

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

Pune Crime | गरिबीमुळे आईनं मोबाईल घेऊन दिला नाही, नाराज मुलाने उचललं टोकाचं पाऊल; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना