Punit Balan Group | तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे १७ मार्च पासून आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर होणार आहे. (Punit Balan Group)

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, ही स्पर्धा एस. बालन यांच्या ४ एप्रिल रोजी असणार्‍या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेली आहे. पुण्यातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण १२ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष आहे. स्पर्धेत एकूण चार लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. (Punit Balan Group)

या स्पर्धेव्दारे स्थानिक व पुण्यातील विविध क्लबमधील खेळाडुंसाठी आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी निर्माण होत आहे. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य समृध्दीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेव्दारे पुण्यातील भागातील मुलांना एक संधी मिळत असून आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत पुनित बालन ग्रुप, गॅरी कर्स्टन, जिनवानी इलेव्हन, एसके डॉमिनेटर्स, रायझिंग डे, गेमचेंजर्स, माणिकचंद ऑक्सिरीच, क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्-पुणे, के.जी.सी.ए., एमईस इलेव्हन, विझार्डस् आणि गाडगे अँड कंपनी इलेव्हन अशा १२ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेत एकूण चार लाख रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये व करंडक मिळणार आहे.

या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ठरणार्‍या खेळाडूला रोख पाच हजार रूपये
अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

गतवर्षी झालेल्या स्पर्धेत जीएसटी अँड कस्टम संघाने विजेतेपद तर,
सेंच्युरी क्रिकेट क्लब संघाने उपविजेतेपद मिळवले होते.

Web Title :- Punit Balan Group | The third Punit Balan T20 League cricket tournament to be held from March 17

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Madras High court | ऑफिसमध्ये खासगी कामासाठी मोबाईल वापरल्यास जाऊ शकते नोकरी, हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात ‘या’ 5 गोष्टी खायला सुरूवात करा, वृद्धत्वापर्यंत शरीरात वाढणार नाही कोलेस्ट्रॉल

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी