Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन, गेमचेंजर्स इलेव्हन संघांचा सलग दुसरा विजय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन आणि गेमचेंजर्स इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत सगल दुसर्‍या विजयाची नोंद केली. (Punit Balan Group)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अदवय सिधये याच्या ५९ धावांच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा ८३ धावांनी पराभव केला. अदवय सिधये याच्या फलंदाजीमुळे एमईएस इलेव्हनने १९४ धावांचे लक्ष उभे केले. अदवय यासह जय पांडे (५१ धावा) आणि हर्ष संगघवी (४२ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्चा डाव १११ धावांवर मर्यादित राहीला.

कर्णधार नौशाद शेख याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गेमचेंजर्स इलेव्हन संघाने रायझिंग डे इलेव्हन संघाचा १०२ धावांनी धुव्वा उडवून सलग दुसरा विजय मिळवला. गेमचेंजर्स इलेव्हनने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७७ धावा जमा केल्या. नौशाद शेख (४६ धावा), आदिल अन्सारी (३५ धावा), रोहन मारवा (३४ धावा) यांनी संघाच्या धावांची बांधणी केली. याला उत्तर देताना रायझिंग डे इलेव्हनचा डाव ७५ धावांवर आटोपला. नौशाद शेख याने १३ धावात ४ गडी टिपत संघाला झटपट विजय मिळवून दिला. (Punit Balan Group)

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः

१) एमईएस इलेव्हनः २० षटकात ३ गडी बाद १९४ धावा (अदवय सिधये ५९ (३८, ८ चौकार, २ षटकार), जय पांडे ५१ (४६, ४ चौकार, १ षटकार), हर्ष संगघवी ४२, दर्शन दातिर १-३२) वि.वि. क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्ः २० षटकात ७ गडी बाद १११ धावा (अक्षय कटारीया ३६, मयुर शिंदे ३०, अदवय सिधये ४-१४); सामनावीरः अदवय सिधये;

२) गेमचेंजर्स इलेव्हनः १९ षटकात ९ गडी बाद १७७ धावा (नौशाद शेख ४६,
आदिल अन्सारी ३५, रोहन मारवा ३४, तुशार श्रीवास्तव २६, सचिन विश्‍वकर्मा ४-२७, महेश येलारपुरे २-८)
वि.वि. रायझिंग डे इलेव्हनः १६.४ षटकात १० गडी बाद ७५ धावा (योगेश येलारपुरे १८, सचिन विश्‍वकर्मा १२,
नौशाद शेख ४-१३, रोहन दामले ३-८); सामनावीरः नौशाद शेख;

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T20 League Cricket Championship! Second consecutive win for MES XI, Gamechangers XI


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Avoid These Things For Your Face | चेहऱ्यावर ‘या’ गोष्टी लावणे टाळा, नाहीतर तुमचा चेहरा होऊ शकतो कुरूप

Sanjay Raut | ‘दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झालं’ – संजय
राऊत

Jacqueline Fernandez Killer Look | जॅकलिन फर्नांडिसनं कॅमेरा समोरचं दिल्या ‘अशा’ पोज, अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाला बोल्ड फोटो