Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Punit Balan Group Women’s Premier League) सायली लोणकर (Saily Lonakar) हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्युट्रीलिशियस् संघाने ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. (Punit Balan Group Women’s Premier League)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ ८२ धावा जमविता आल्या. तेजल हसबनीस (१७ धावा), श्रद्धा पोखरकर (१६ धावा) आणि जाई देवन्नावर (१३ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. सायली लोणकर हिने १५ धावात ३ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली. या शिवाय संजना वाघमोडे (२-१२) व आरती बाहेनवाल (२-१२) यांनीही अचूक गोलंदाजी केली.

हे आव्हान न्युट्रीलिशियस् संघाने १२.५ षटकात व ३ गडी गमावूण पूर्ण केले. गौतमी नाईक हिने नाबाद ३० धावा तर,
सायली लोणकर हिने नाबाद २३ धावांचे योगदान दिले व संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक संदीलदादा कोद्रे आणि सौरभ रवालिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हृषीकेश आगाशे,
प्रफुल्ल मानकर, रोहीत खारडे, स्पर्धेचे संचालक अमित गणपुळे आणि अभिराज वाधवाने आदि मान्यवर उपस्थित होते.

 

गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

ऑक्सिरीच स्मॅशर्सः २० षटकात १० गडी बाद ८२ धावा (तेजल हसबनीस १७, श्रद्धा पोखरकर १६, जाई देवन्नावर १३, सायली लोणकर ३-१५,
संजना वाघमोडे २-१२, आरती बाहेनवाल २-१२) पराभूत वि. न्युट्रीलिशियस् संघः १२.५ षटकात ३ गडी बाद ८३ धावा (गौतमी नाईक नाबाद ३०,
सायली लोणकर नाबाद २३, सोनल पाटील १३, श्रद्धा पोखरकर १-२२); सामनावीरः सायली लोणकर.

Web Title : 7th Punit Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला