Punit Balan Group Women’s Premier League | सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धेचे 10 मे पासून आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० ते १६ मे २०२२ या कालावधीत मुंढवा (Mundhwa) येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर होणार आहे. (Punit Balan Group Women’s Premier League)

 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक अमित गणपुळे (Amit Ganapule) आणि अभिराज वाधवाने (Abhiraj Wadhwane) यांनी सांगितले की, केवळ महिला खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ६ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. गेले सहा वर्ष महिलांसाठीची ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आणि या वर्षी स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पुनित बालन ग्रुपने या स्पर्धेला प्रायोजक्त्व दिले आहे. (Punit Balan Group Women’s Premier League)

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यस्तरावरील तसेच रणजी संघांमध्ये सहभागी असलेल्या महिला खेळाडू सहभागी होत आहे. या स्पर्धेव्दारे महिला खेळाडुंसाठी आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी निर्माण होत आहे. महिला खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य समृध्दीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेव्दारे ग्रामीण भागातील मुलींना एक संधी मिळत असून आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचे पुनित बालन ग्रुपचे चेअरमन पुनित बालन (Punit Balan) यांनी सांगितले.

 

स्पर्धेचे आयोजक अमित गणपुळे आणि अभिराज वाधवाने यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत ऑक्सिरीच स्मॅशर्स (पुनित बालन), स्मार्ट लायन्स् (राजेश तांदळे), लिजंड्स स्पोर्ट्स क्लब (संदीपदादा कोद्रे), वॉरीयर्स स्पोर्ट्स (स्वप्निल मोदक), न्युट्रीलिशियस् (धीरज जैन), हेमंत पाटील ग्रुप (हेमंत पाटील) या सहा निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

आठ दिवस चालणार्‍या या स्पर्धेच्या संघांची आणि खेळाडूंची निवड लिलावाने करण्यात आली. हा लिलाव रोख रक्कमेचा नव्हता तर, गुण पध्दतीचा होता. ९० खेळाडूंची गुण-पध्दतीने सहा संघांमध्ये विभागणी करण्यात आली. महाराष्ट्राची खेळाडू आयेशा शेख हिला (३५००० गुणांनी) स्मार्ट लायन्स् संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले आहे. इबतिसम शेख हिला ३०००० गुणांनी वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाने तर, अभिलाशा पाटील हिला २९००० गुणांनी लिजेंडस् स्पोर्टस् संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे.

 

प्रत्येक संघांमध्ये एक ऑयकॉन खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र २३ वर्षाखालील कर्णधार व आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेली
खेळाडू तेजल हसबनीस ही ऑक्सिरीच स्मॅशर्स संघामध्ये आहे.
महाराष्ट्र महिला संघाचे प्रतिनिधीत्व श्रध्दा पोखरकर, उत्कर्षा पवार, मुक्ता मगरे,
सायली लोणकर अशा अनेक महाराष्ट्रातील महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

 

ऑक्सिरीच स्मॅशर्स- तेजल हसबनीस, स्मार्ट लायन्स्- किरण नवगिरे, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब- उत्कर्षा पवार,
वॉरीयर्स स्पोर्ट्स- सुशमा पाटील, न्युट्रीलिशियस्- गौतमी नाईक,
हेमंत पाटील ग्रुप- पुनम खेमनार हे खेळाडू आपापल्या संघांचे कर्णधारपद भुषविणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे.
याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू
आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात आहेत.
तसेच १५ वर्षाखालील महिला खेळाडूला उदयोन्मुख खेळाडू असे विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे.

 

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | Seventh ‘Punit Balan Group Women’s Premier League’ T-20 cricket tournament to be held from May 10

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा