Puntamba Farmer Protest | पुणतांब्यात केंद्र-राज्य सरकार विरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार सुरू

पोलीसनामा ऑनलाइन –Puntamba Farmer Protest | दूध, शेतमालाला हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केंद्र  (Central Governments) आणि राज्य सरकारला (State Governments) आठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र या मागण्यांसंदर्भात कोणत्याही सरकारने कार्यवाही केली नाही. किंबहुना दखलच घेतली गेली नाही. त्यामुळे बुधवारपासून पुणतांब्यात दोन्ही सरकार विरुद्ध शेतकऱ्यांनी ‘एल्गार’ (Puntamba Farmer Protest) पुकारला आहे. राज्यव्यापी आंदोलनाची पुणतांबेकरांनी हाक दिली असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांनी शेतकरी पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलनाची मशाल पेटवली.

 

राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तर 23 मे रोजी ग्रामसभा (Gram Sabha) झाली होती. त्यामध्ये 16 ठराव करण्यात आले होते. त्याची प्रतही तहसीलदारांना देण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे किसन क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास (Puntamba Farmer Protest) सुरुवात केली आहे. 1 ते 5 जून दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येईल. या धरणे आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही किसन क्रांतीने (Kisan Revolution) दिला आहे.

 

पोलिसांची नोटीस –

 

दरम्यान, राहाता पोलीस ठाण्याचे (Rahata Police Station) पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड (Police Inspector Sunil Gaikwad) यांनी धरणे आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. कोरोना विषाणूचा आपणाकडून प्रसार झाल्यास, कायद्याचे उल्लंघन केल्यास आपणाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसीद्वारे आंदोलकांना देण्यात आला आहे.

 

Web Title :- Puntamba Farmer Protest | farmers in puntambas maharashtra started agitation


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा